देसाईंचा मुलगाच एजंट असल्याचा खासदार इम्तियाज जलील यांचा आरोप
औरंगाबाद : राज्यातल्या चार मंत्र्यांवर एकीकडे आरोप होत असतानाच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी सुभाष देसाई यांच्यावर १२० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी लँड कन्वर्जनच्या नावाखाली औरंगाबाद मध्ये ५२ प्लॉट रूपांतरीत केल्याचा आरोप केला आहे. बुधवारी सुभेदारी विश्राम गृह वर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, चिकलठाणा इंडस्ट्रियल भागात ५२ प्लॉटचा वापर बदलण्यात आला आहे. आणि यातील सगळ्यात मोठा एजंट हा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मुलगा होता. त्यामुळे याबाबत एसआयटी स्थापन करून चौकशी केली तर सुभाष देसाई तुरुंगात असतील, असा दावा जलील यांनी केला आहे.