अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना २७ डिसेंबरच्या रात्री अहमदाबादच्या यू एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात जास्त माहिती देण्यात आलेली नाही. फक्त भरतीबद्दल माहिती दिली आहे आणि हिराबेन यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. त्याआधी २७ डिसेंबर रोजी दुपारी पंतप्रधानांचे भाऊ प्रल्हाद मोदी रस्ता अपघातात जखमी झाल्याची बातमी आली होती.
Ahmedabad: Prime Minister Narendra Modi's mother Hiraben (100) admitted to hospital
— Press Trust of India (@PTI_News) December 28, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, हिराबेन यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते.
दरम्यान, हिराबेन यांनी १८ जून रोजी त्यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे पाय धुवून आशीर्वाद घेतले. यानंतर पीएम मोदींनी एक भावनिक पोस्टही लिहिली होती. तर, पंतप्रधान मोदींनी गुजरात निवडणुकीच्या दरम्यान गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेटही घेतली होती.