Friday, October 31, 2025
Happy Diwali

सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार

सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

नागपूर : सीमाप्रश्नी कर्नाटक विरोधातील ठराव आज अधिवेशनात एकमताने संमत करण्यात आला. कर्नाटक सीमेवर असणाऱ्या ८६५ गावांना महाराष्ट्रात आणण्याचा निधार आज विधानसभेत करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी बलिदान देणाऱ्या कुटुंबांना २० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्यांनी सीमाप्रश्नी बलिदान दिले त्यांना हुतात्मा म्हणून घोषित केले आहे. सध्या १३ लाभार्थी लाभ घेत आहेत. बेळगाव, कारवार, बिदर येथील मराठी लोकांना सर्व सोयी सुविधा मिळणार आहे. या नागरिकांना फक्त १५ वर्ष महाराष्ट्रात राहत असल्याचा दाखला द्यायचा आहे. तसेच शिक्षणासाठीही त्यांना सोयी-सुविधा देण्यात आलेल्या आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमेवरील नागरिकांचे आभार मानले. बलिदान देणाऱ्या नागरिकांना हुतात्मा म्हणून घोषित करण्यात आले, त्यांच्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला दरमहा १० हजार रुपये निवृत्ती वेतन तसेच वार्षिक प्रवास भत्ता ५०० रुपये आणि ५ हजार रुपये तत्कालीक होती ती आपण आता २० हजार रुपये करण्यात आली आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >