Tuesday, July 1, 2025

रत्नागिरी जिल्हयात कोरोना रुग्ण सापडला

रत्नागिरी जिल्हयात कोरोना रुग्ण सापडला

मंडणगड येथील रुग्णाची अँटिजेन टेस्ट आली पॉझिटिव्ह


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मंडणगड तालुक्यातील पाल्ये गावातील एका रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याच्यावर दापोली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


चीनमध्ये हाहाकार उडालेला असताना आता महाराष्ट्रात रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. तुर्तास तरी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही, पण काळजी घेणे आवश्यक आहे. या संशयित रुग्णाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी पाठवण्यात आली आहे, अशी अशी माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली.


दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आरोग्य विभागाने कंबर कसून कामाला लागले आहे.


कोकणातील मोठे रुग्णालय असलेल्या चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >