कृषी महोत्सवाच्या नावाने वसुली
नागपूर : सिल्लोड येथील कृषी महोत्सवावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात असून कृषी महोत्सवाच्या नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा प्रकार घडला असेल तर नक्कीच कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.
दुसरीकडे राजीनामा द्या, राजीनामा द्या, अब्दुल सत्तार राजीनामा द्या, अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी झाली पाहिजे. गायरान बेचनेवालों को जुते मारो सालों को, ५० खोके एकदम ओके, सत्ताराने घेतले खोके, सरकार म्हणतेय एकदम ओके, वसुली सरकार हाय हाय, श्रीखंड घ्या, कुणी भूखंड घ्या, अशा घोषणा देत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये उतरत खाली बसून जोरदार निदर्शने केली.