मुंबई : ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज घरोघरी जाऊन मुलांना भेटवस्तू, चॉकलेट्स देतात. त्यामुळे लहान मुलंही खूप दिवसांपासून सांताक्लॉजची आतुरतेने वाट पाहत असतात. याच दरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ (Video) समोर आला आहे. लहान मुलांना गिफ्ट देण्यावरून सांताक्लॉजमध्येच तुंबळ हाणामारी, बेदम मारहाण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर या भांडणाचा व्हि़डीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये सांताक्लॉज आपापसात भिडले आणि एकमेकांच्या जीवावर उठले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या सर्वांनी सांताक्लॉजची वेशभूषा केली आहे. ज्यामुळे या सगळ्यांमधील हे भांडण इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.
https://twitter.com/ViciousVideos/status/1606229376655400960
हे सांता एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारताना करताना दिसत आहेत. हा भन्नाट व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सही पोट धरून हसत आहेत. @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.