मुंबई : मुंबईतील लोअर परेल परिसरात एका १५ वर्षीय मुलीवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलीला तिचा मित्र त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला होता, जिथे सहाही जणांनी मिळून मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील तीन आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते. या प्रकरणी एन एम जोशी पोलिसात गुन्हा दाखल असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात अल्पवयीन आरोपींपैकी एक जण हा संबंधित मुलीच्या चांगल्या मित्रांपैकी एक आहे. २३ डिसेंबर रोजी तो मुलीला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला, जिथे सर्व आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या या प्रकरणाचा तपास एन एम जोशी पोलीस करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुंबई पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. पोलीस या आरोपींची अधिक चौकशी करत आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींपैकी तीन आरोपी प्रौढ आहेत. या आरोपींनी याआधीही अशाप्रकारचे कृत्य केले आहे, याचा तपासही पोलीस करत आहेत. शिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. तर तीन अल्पवयीन आरोपींची रवानगी डोंगरी भागातील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.
याआधीही मुंबईतून याच महिन्यात एका महिलेसोबत सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. तीन नराधमांनी अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडत एका ४२ वर्षीय महिलेवर अत्याचार केले. या तिघांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिच्या गुप्तांगावर सिगारेटने चटके दिले.
चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४३व्या सामन्यात आज सनरायजर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्स…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण त्रयोदशी ८.३० पर्यंत नंतर चतुर्दशी शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराभाद्रपदा…
पावसाळा आता जेमतेम सव्वा महिन्यावर आलेला आहे. पावसाळी हंगामास दरवर्षी कागदोपत्री १ जूनला सुरुवात होत…
मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही…
रवींद्र तांबे ग्रामीण भागाचा विचार करता अजूनही पुरेशा मूलभूत सोयी नसल्याने नागरिक मुलांना घेऊन शहराकडे…
मुंबई: पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर जखमी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल…