नवी दिल्ली : चीनमध्ये एकाच दिवसात तब्बल ३.७ कोटी कोरोनाचे केसेस आढळून आल्याने आता इतर देशांचे धाब दणाणले आहे. भारतानेही हा प्रकार गांभीर्याने घेण्यात आला असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना नव्याने तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ताजी सहा मुद्द्यांची कोविड अॅडव्हायजरी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्यांनी ऑक्सिजन सिलेंडर्स आणि व्हेंटिलेटर्स तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
The Ministry of Health and Family Welfare writes to all States/UTs to ensure a functional and regular supply of medical oxygen for Covid19 pandemic management pic.twitter.com/WFQC8LlqTs
— ANI (@ANI) December 24, 2022
देशात सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. कोविडच्या रुग्ण संख्येत वाढ होत असतील तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे. पण भविष्यातील धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्राने सर्व राज्यांना तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. नव्याने काढलेल्या अॅडव्हायजरीत वैद्यकीय पायाभूत सुविधांची देखभाल आणि त्या पुन्हा अॅक्टिव्ह करण्याबाबतचे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.
केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, तुमच्याकडील मेडिकल ऑक्सिजन निर्मिती करणारे पीएसए प्लॅंट्स पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचे तसेच त्याची नियमित तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्याचबरोबर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता तसेच ते पुन्हा विनाव्यत्यय रिफील करण्याची व्यवस्थाही तयार असल्याची खात्री करुन घ्यावी, असे निर्देशही आरोग्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.