बापरे! चीनची लस बोगस? चीनमध्ये झालेय २५ कोटी लोकांना कोरोनाची लागण

Share

जिनपिंग यांच्या धोरणांमुळे अनेक देशांना धोका

ना प्रतिकारशक्ती वाढली ना उपचार झाले

बिजींग : चीनमधून पुन्हा एकदा कोरोनाचा मोठा विस्फोट झाल्याचे समोर आले आहे. यामागे चीनची बोगस लस हे मोठे कारण आहे. जिथे एकीकडे भारत, अमेरिका सारख्या देशांमध्ये या लसीने लोकांची रोगप्रतिकारशक्ती सुधारली. त्याचवेळी चीनच्या धोरणांचा उलटा परिणाम दिसून आला. चिनी उत्पादनाप्रमाणे, त्यांच्या लसीचीही खात्री नाही. लसीच्या नावाखाली चीनने जगाला मूर्ख बनवले आणि आता तेच या जाळ्यात फसले आहेत.

बापरे! २० दिवसांतच चीनमध्ये २५ कोटी लोकांना कोरोनाची लागण

सरकारी डॉक्युमेन्ट लीक; उडाला एकच गोंधळ!

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या २० मिनिटांच्या बैठकीमधून लीक झालेल्या या दस्तऐवजानुसार, चीनमध्ये एक ते २० डिसेंबरदरम्यान २४.८ कोटी लोक कोरोना संक्रमित झाले आहेत.

चीनमध्ये कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. यासंदर्भात लीक झालेल्या सरकारी कागदपत्रांचा हवाला देत, शून्य कोविड धोरण सैल झाल्यानंतर, केवळ २० दिवसांतच चीनमध्ये तब्बल २५ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा रेडिओ फ्री एशियाने केला आहे. चीनच्या एकूण लोकसंख्येचा विचार करता हा आकडा १७.६५ टक्के एवढा आहे.

रेडिओ फ्री एशियाने म्हटल्यानुसार, २० डिसेंबरला सरकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेले कोरोना बाधितांचे आकडे खरे नाहीत. एका वरिष्ठ चिनी पत्रकाराने गुरुवारी रेडिओ फ्री एशियासोबत बोलताना सांगितले की, दस्तऐवज खरे होते आणि ते बैठकीत सहभागी झालेल्या अशा व्यक्तीने लिक केले, जी व्यक्ती जाणूनबुजून आणि सार्वजनिक हितासाठी काम करत होती. हे नवे आकडे समोर आल्यानंतर गोंधळ उडाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये पुन्हा एकदा कडक नियम तयार केले जात आहेत.

तत्पूर्वी शनिवारी, अधिकृत आकडेवारीचा हवाला देत, 3,761 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून एकही नवा मृत्यू नाही, असे चीनने म्हटले होते. महत्वाचे म्हणजे, ब्रिटिनमधील हेल्थ डेटा फर्म एअरफिनिटीने, चीनमध्ये कोरोना संसर्गाचा रोजचा आकडा 10 लाखाहून अधिक आणि मृतांचा आकडा 5,000 हून अधिक असण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. असे असतानाच हा अहवाल समोर आला आहे.

एअरफिनिटीच्या नव्या मॉडेलने चीनमधील काही प्रांतांमधील डेटा तपासला आहे. काही बागात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत आहे. बिजिंग आणि ग्वांगडोंगमध्ये मोठ्या प्रमाणेवर कोरोना बाधित समोर येत आहेत.

एका निवेदना एअरफिनिटीने म्हटले आहे की, “प्रांतांमधील आकडेवारीनुसार, आमच्या टीमने, ज्या भागांत वेगाने कोरोना पसरत आहे, त्या भागांत सर्वप्रथम पीक येईल आणि नंतर इतर भागांत येईल, अशी शक्यता वर्तवली आहे.”

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, एअरफिनिटी मॉडेलचा अंदाज आहे, की जानेवारी 2023 मध्ये संसर्गाचा दर पीकवर 3.7 मिलियन आणि मार्च 2023 मध्ये एका दिवसात 4.2 मिलियनपर्यंत पोहोचू शकतो.

एअरफिनिटीमध्ये व्हॅक्सीन आणि अॅपिडेमोलॉजीचे प्रमुख डॉ. लूईस ब्लेअर यांनी म्हटल्यानुसार, चीन मोठ्या प्रमाणावर टेस्टींगही करत नाही आणि लक्षण नसलेल्या कोरोना बाधितांची मोजणीही करत नाही. यामुळे देशात प्रत्यक्षात जेवढे कोरोना रुग्ण आहेत, त्या तुलनेत आकडे वेगळे आणि कमी येत आहेत.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

1 hour ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

1 hour ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

1 hour ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

1 hour ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

1 hour ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

1 hour ago