Monday, May 12, 2025

देशताज्या घडामोडीराजकीय

कोचर दाम्पत्याला सीबीआय कोठडी

कोचर दाम्पत्याला सीबीआय कोठडी

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि दीपक कोचर यांना 3 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी कोचर दाम्पत्याला न्यायालयात हजर करणार आहेत. चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आज सीबीआयची टीम कोर्टामधून बीकेसी इथल्या सीबीआयच्या कार्यालयात आणले आहे. काल कोचर दाम्पत्याला सीबीआयने अटक केली. चंदा कोचर यांना सीबीआयने अटक केल्यानंतर बँकिंग आणि अर्थविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.


एकेकाळी फोर्ब्सच्या यादीत भारतातील सर्वात शक्तीशाली महिला म्हणून झळकणाऱ्या चंदा कोचर या बँकिंग आणि अर्थविश्वातील मोठं नाव आहे. 2009 साली आयसीआयसीआय बँकेची सूत्र त्यांनी हातात घेतली आणि एका वेगळ्या उंचीवर त्यांनी आयसीआयसीआय बँकेला नेऊन ठेवलं होतं.


चंदा कोचर यांची 1984 साली मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आयसीआयसीआय मध्ये एन्ट्री झाली. त्यावेळी खासगी बँक म्हणून आयसीआयसीआय स्थापन देखील झाली नव्हती. 90च्या दशकात आयसीआयसीआयने बॅंकिंग क्षेत्रात पदार्पण केले आणि वयाच्या 22व्या वर्षापासून बँकिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या चंदा कोचर वयाच्या 47व्या वर्षी भारतातील बँकेची सीईओ बनणाऱ्या पहिल्या महिला सीईओ बनल्या.


2009 साली एमडी आणि सीईओ पदाची जबाबदारी मिळाल्यावर फोर्ब्सच्या यादीत 100 पैकी 20व्या स्थानावर होत्या. जगातील शक्तीशाली महिलांच्या यादीत भारतात सोनिया गांधींनंतर कोचर यांना स्थान देण्यात आलं होतं.


2011 साली भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. एक काळ असा होता की मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारे विद्यार्थी चंदा कोचर यांच्याकडे आदर्श म्हणून बघत होते. अशात 2018 साली एका तक्रारीनं चंदा कोचर यांचं आयुष्य पालटलंय. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आणि आज त्या सीबीआय कोठडीत आहे.

Comments
Add Comment