Tuesday, March 25, 2025
Homeदेशमास्कसह कोरोनोच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

मास्कसह कोरोनोच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन

सर्व राज्यांना केल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींकडून महत्वाच्या सूचना

नवी दिल्ली : मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे. तसेच येणारे सण आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राज्यांनी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यांमध्ये आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

भारतात सध्यातरी परिस्थिती धोक्याची नाही. परंतु संभाव्य धोके ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी जिनोम सिक्वेन्सींग टेस्ट वाढवण्यात याव्यात, असे आदेश दिले. तसेच राज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर तयार ठेवावेत, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणा अलर्टवर ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत दिल्या. लसीकरणासह सतर्क राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले. तसेच कोरोना नियमांसंदर्भात जनतेत पुन्हा जागरुकता आणावी अशा सूचना त्यांनी राज्यांना दिल्या.

भारतीयांना घाबरण्याचे कारण नाही – डॉ. रवी गोडसे

जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही भीतीचे सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचे काही कारण नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटले. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असे मत रवी गोडसे यांनी व्यक्त केले.

नेझल लसीच्या वापराला भारतात परवानगी

जागतिक पातळीवर कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असताना भारतात आता कोरोना विषाणू विरोधातील नेझल लसीच्या वापराला लसींना मान्यता देणाऱ्या तज्ज्ञांच्या समितीने आज परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरोधातील तयारीचा आढावा घेत उच्चस्तरिय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर नेझल लसीला मान्यता देण्यात आली. कोरोना लसीचे इंजेक्शन घेण्याची इच्छा नसणाऱ्या लोकांसाठी नेझल लस हा मोठा दिलासा ठरणार आहे. नाकावाटे स्प्रेच्या स्वरुपात दिली जाणारी लस इंजेक्टेबल लसीपेक्षा चांगली व फायदेशीर मानली जात आहे.

राज्यात कोविड टास्कफोर्सची होणार पुनर्रचना

राज्यातील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक नागपूर येथे पार पडली. या बैठकीत नव्याने कोविड टास्कफोर्स तयार करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन तसेच आरोग्य अधिकारी उपस्थित होते. या नव्या टास्कफोर्समध्ये आणखी काही तज्ज्ञ डॉक्टरांचा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. तसेच सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा राज्याच्या प्रमुखांना देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच कोविडची जागतिक स्थिती तसेच राज्यात पुन्हा कोविडची परिस्थिती उद्भवली तर आपण सज्ज आहोत का? आपल्याकडे रुग्णालयात पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत का? याची माहिती यावेळी देण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -