Saturday, July 13, 2024
Homeताज्या घडामोडीMukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

Mukta Tilak : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

पुणे : पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार तथा पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाले. त्या ५७ वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंजत होत्या. पुण्यातील गॅलेक्सी केअर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई होत्या. अर्थात बाळ गंगाधर टिळकांच्या त्या पणतसून होत्या.

भाजपच्या प्रामाणिक कार्यकर्त्या, पक्षादेशाला त्यांनी नेहमी प्रमाण मानून राजकीय जीवनात काम केले. अगदी कर्करोगाशी झुंजत असताना त्यांनी व्हिलचेअरमध्ये बसून मुंबईत येऊन राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीकरिता मतदान केले. कर्तव्यनिष्ठेला महत्त्व देणाऱ्या कार्यकर्त्या आज आमच्यातून गेल्या, अशा भावना पुणे भाजपचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

२०१७ ते २०१९ या काळात त्या पुण्याच्या महापौर होत्या. महापौर म्हणून केलेल्या कामावर खूश होऊन पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. गिरीश बापट यांच्या कसबा मतदारसंघातून त्यांनी दणक्यात विजय मिळवून विधानसभेत पाऊल ठेवले. पण त्याचवेळी त्यांना कर्करोगाची लागण झाली. पुढे दोन ते अडीच वर्ष त्यांना कर्करोग आणि अनेक व्याधींनी ग्रासले होते. त्यामुळे सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावर अतिशय कमी झाला होता. पण रुग्णालयातून त्या लोकांची कामे करत राहिल्या, अधिकाऱ्यांना सूचना देत राहिल्या. पण आज कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -