Saturday, July 5, 2025

चीनमध्ये उद्रेक झालेल्या बीएफ.७ व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

चीनमध्ये उद्रेक झालेल्या बीएफ.७ व्हेरिएंटची भारतात एन्ट्री

नवी दिल्ली : चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे भारतासह जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या बीएफ.७ या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंटचे तीन रूग्ण आढळून आले आहेत.


भारतात आतापर्यंत बीएफ.७ चे दोन रूग्ण गुजरातमध्ये तर एक रूग्ण ओडिशात नोंदवला गेला आहे. यूएस, यूके आणि बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा