कोरोना अद्याप संपलेला नाही, डोस घेतला नसेल तर घ्या, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला

  56

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन


नवी दिल्ली : कोरोना अद्याप संपलेला नाही, असे विधान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे. त्यामुळे देशात पुन्हा कोरोनाचे संकट घोंघावत असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यासंदर्भात सर्व यंत्रणांना अॅलर्ट राहण्याचे आदेशही आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. लक्षणं असतील तर कोरोना टेस्ट करा. ज्यांनी प्रतिबंधात्मक डोस घेतला नसेल तर त्यांनी डोस घ्यावा, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा, असे आवाहनही आरोग्य मंत्र्यांकडून करण्यात आले आहे.


https://twitter.com/mansukhmandviya/status/1605476698207637504

काही देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणं पाहता आज आम्ही भारतातील कोरोनाच्या स्थितीचा तज्ज्ञांच्या आणि अधिकाऱ्यांमार्फत आढावा घेतला. कोविड अद्याप संपलेला नाही. यावेळी सर्व संबंधितांना अॅलर्ट आणि जागरुकता वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणतीही परिस्थिती हाताळण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे ते म्हणाले.


दरम्यान, बैठकीबाबत नीती आयोगाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, कोरोनाच्या जागतीक परिस्थितीवर आज केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थित चर्चा झाली. कोरोनाच्या बाबतीत आपण सतर्क आहोत. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. या बैठकीत चीनच्या नवीन व्हेरिअटची चर्चा झाली. भारतातील सर्व रुग्णालातील न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी केली जाईल. यासंदर्भात प्रत्येक आठवड्यात बैठक होईल.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये

IMD Monsoon Alert: जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार, हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने (IMD) जुलै महिन्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. देशवासीयांना या महिन्यात