वैभववाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. १७ पैकी १४ ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली.
नितेश राणे यांनी अगोदरच १७ पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणल्या होत्या, आज निकाल लागल्यानंतर आणखी ९ ग्रामपंचायती भाजपाने मिळवल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. वैभववाडी तालुक्यात दोन ग्रामपंचायती ग्रामविकास पॅनलला मिळाल्या तर शिंदे गटाला अवघी एक ग्रामपंचायत मिळाली.
नांदगावकरांनी राणेंनी धमकावले म्हणणा-यांचे दात घशात घातले
आमदार नितेश राणे यांनी माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडुन आणा आणि हक्काने निधी मागा, असे आवाहन केले होते त्या नांदगाव या गावाने सरपंच सहित ११ पैकी १० सदस्य भाजपाचे विजयी केले. यामुळे निषेधाच्या पोस्ट करणारे तोंडावर पडले आहेत.
आमदार नितेश राणे यांनी समस्त नांदगाववासियांना हक्काने सांगितले होते की, माझ्या विचाराचा सरपंच आणि सदस्य निवडुन आणा आणि हक्काने निधी मागा. त्याच नांदगाववासियांनी भाजपाचे सरपंच भाई मोरजकर आणि भाजपाचे ११ पैकी १० सदस्य निवडून दिले. याद्वारे त्यांनी उबाठाच्या चमच्यांना इशारा दिला आहे की, समस्त नांदगाववासिय राणे परिवारच्या पाठीशी आहेत. राणेंनी धमकावले म्हणणाऱ्यांचे नांदगावकरांनी दात घशात घातले असून कणकवली भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर आणि नवनिर्वाचित सरपंच भाई मोरजकर आणि कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला.