Monday, June 30, 2025

Samruddhi : समृद्धी महामार्ग कोणासाठी?

सात दिवसांत ३० अपघात, तर ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत


नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याहस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) लोकार्पण करण्यात आले. समृद्धीवर महामार्गाचे उद्घाटन झाल्यावर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आला आहे. मात्र हा महामार्ग अपघातांच्या मालिकेने चर्चेत आला आहे. गेल्या सात दिवसांत समृद्धीवर महामार्गावर तब्बल ३० अपघात (Accident) झाले आहेत. तर वेगवेगळ्या ६५ घटनांमध्ये वन्यप्राण्यांनाही दुखापत झाल्याने यावरील होणारे अपघात चिंतेचा विषय बनला आहे.


समृद्धी महामार्गावर १२० पर्यंत वेगमर्यादा देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक अतिवेगाने वाहने चालवीत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. बहुतांश वन्यप्राण्यांना वाहनाची धडक लागल्याने त्यांचा जीवही गेला आहे. त्यामुळे या महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावराबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.

Comments
Add Comment