Monday, June 16, 2025

आता 'हायड्रोजन पॉवर'वर धावणार वंदे मेट्रो ट्रेन्स

आता 'हायड्रोजन पॉवर'वर धावणार वंदे मेट्रो ट्रेन्स

नवी दिल्ली : भारतात आता हायड्रोजन पॉवरवर रेल्वे धावणार आहे. हायड्रोजनवर चालणारी ही वंदे मेट्रो ट्रेन पुढील वर्षात सुरु होईल, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. स्वदेशी रुपात डिझाईन आणि निर्माण करण्यात आलेली ही ट्रेन देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन असणार आहे, जी डिसेंबर २०२३ मध्ये धावणार आहे, असेही मंत्री वैष्णव यांनी सांगितले.


प्रवाशांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेता रेल्वेच्या वतीने वंदे मेट्रो तयार करण्यात येत आहे. सन १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या ट्रेन्सची जागा घेणार आहे. याची माहिती रेल्वे आणि संचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.


वैष्णव म्हणाले, आम्ही वंदे मेट्रो ट्रेनचे डिझाईन तयार करत आहोत हे डिझाईन मे किंवा जूनपर्यंत तयार होईल. जागतिक स्तरावर आम्ही हे वंदे मेट्रोचे डिझाईन तयार करत आहोत जी मोठी झेप असेल. या वंदे मेट्रो ट्रेन्सची निर्मिती इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे की, देशभरात १९५० आणि १९६० च्या दशकात डिझाईन करण्यात आलेल्या सर्व ट्रेन्स बदलण्यात येतील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >