Sunday, August 31, 2025

shame : जरा तरी तमा बाळगा!

shame : जरा तरी तमा बाळगा!

‘त्या’ व्हिडिओवरुन राऊत आणि ठोंबरेंना संभाजीराजे, नितेश राणेंसह नेटक-यांनी खडसावले

मुंबई : संजय राऊत यांनी ज्या मोर्चाला 'मुका मोर्चा' म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात, जरा तरी तमा (shame) बाळगा!, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1604497616263598085

राज्याच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्याआधी महाविकास आघाडीने महामोर्चा काढत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा नॅनो मोर्चा होता, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. यानंतर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा महामोर्चा किती विशाल होता हे दाखवणारा व्हिडिओही ट्विट केला.

https://twitter.com/NiteshNRane/status/1604475091496361985

मात्र, भाजप आमदार नितेश राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा व्हिडिओ महामोर्चाचा नसून, मराठा मोर्चाचा असल्याचे सांगितले. यानंतर संभाजीराजे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधून चांगलेच खडसावले.

संजय राऊत ज्या मोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून हिणवले तोच मराठा क्रांती मोर्चा आज स्वतःच्या राजकारणासाठी वापरत आहात. या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच होता. आज नसलेली ताकद दाखविण्यासाठी एकेकाळी ज्या मराठा समाजाला हिणवले, त्यांचाच मोर्चा वापरताना जरा तरी तमा बाळगा!, असे ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

https://twitter.com/pallavict/status/1604480718033543169

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही तोच व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा स्पष्ट ऐकू येत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना पाटील म्हणाल्या की, महाविकास आघाडीचा विराट मोर्चा ड्रोन मधून पहायचा होता, पहा उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ छत्रपती शिवाजी महाराज, महापुरुष के सन्मान में महाविकास आघाडी मैदान में. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांनी रुपाली ठोंबरे पाटलांना सुद्धा चांगलेच खडसावले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >