Sunday, March 23, 2025
Homeमहत्वाची बातमीMVA Flop Morcha : देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो...

MVA Flop Morcha : देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे हा नॅनो मोर्चा झाला

मुंबई : महाविकास आघाडीने मुंबईत महामोर्चा (MVA Flop Morcha) काढला. या मोर्चात तीनही पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. याशिवाय महाविकास आघाडीचे अनेक आघाडीचे नेते मोर्चात होते. या मोर्चाविरोधात भाजपने राज्यात ठिकठिकाणी माफी मांगो निदर्शने केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली.

तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत

महाविकास आघाडीचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते मोर्चा काढतात. दररोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना स्वतःचे सरकार टिकवता आले नाही, त्यांच्या नाकाच्या खालून आम्ही हे सरकार घेऊन गेलो. त्यामुळे हे सरकार टिकेल आणि पुन्हा सत्तेत येऊ. तीन जण येऊन पण गर्दी जमवू शकले नाहीत. उद्धव ठाकरे यांचा पक्ष जसा नॅनो आहे, तसा हा मोर्चा नॅनो होता. उद्धव ठाकरे यांची कॅसेट तशीच होती जी बदलली नाही. त्यांच्या भाषणात एकही नवीन मुद्दा नाही, अशा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत

दरम्यान, सीमाप्रश्नाचा वाद आजचा नाही. गेली साठ वर्षे हा वाद सुरू आहे. सीमा प्रश्नाला काँग्रेस जबाबदार आहे, या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाशी मी सहमत आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ड्रोन शॉटलायक मोर्चाच नव्हता

महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊन देखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोन शॉटलायक देखील नव्हता, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते. परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा अतिशय मिनी होता.

ठाकरेंनी नवीन स्क्रिप्ट रायटर ठेवावा

आजच्या मोर्चात उद्धव ठाकरे नवीन काहीतरी बोलतील अशी आशा होती. पण तसे अजिबात झाले नाही. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे हे ठरलेले वाक्य बोलले आहेत. उद्धव ठाकरे हे किती दिवस तेच तेच डायलॉग बोलणार आहेत. शिवराळ भाषा वापरायची म्हणजे झाले बोलणे, अशी गत ठाकरेंची झालेली आहे. त्यांनी नवीन गोष्टी पाहाव्या, नवीन स्क्रिफ्ट रायटर ठेवावा, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

आझाद मैदानाऐवजी त्यांनी छोटा रस्ता निवडला

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही आझाद मैदानावर मोर्चा घ्यावा, असे आवाहन केले होते. आम्ही त्यासाठी परवानगी देऊ इच्छित होतो. परंतु त्यांना माहित होते की, एवढी लोकांची संख्या आपल्याकडून आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी गल्लीबोळातून हा मोर्चा काढण्याची परवानगी घेतली. एक प्रकारे हा मोर्चा असफल झाला आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.

राहुल गांधींवर देखील फडवीसांचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिलावर भुट्टो आणि राहुल गांधी एकत्र कसे बोलतात? बिलावर भुट्टो एका फेल राष्ट्राचे मंत्री आहेत. ते आतंकवादी देशाचे मंत्री आहेत. पण भारताच्या पंतप्रधानांबद्दल भुट्टो बोलतो तेव्हा देशासाठी भुट्टोची निंदा करायला हवी होती. पण त्यांनी केली नाही. भारताचा भूभाग जेव्हा चीनमध्ये गेला, तेव्हा राहुल गांधी यांच्या घरातील व्यक्ती नेतृत्व करत होती. त्यामुळे राहुल गांधी यांना बोलण्याचा अधिकार नाही. मोदींच्या काळात तर चीनला रोखण्याचे काम केले आहे. एक इंच भारताची भूमी मोदींच्या काळात गेली नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -