हा तर नुसता थयथयाट!

भाजपा आमदार भातखळकर यांनी मविआला डिवचले!


मुंबई : संत, सज्जन आणि महापुरुषांचा अपमान करत काढलेला हा मोर्चा म्हणजे सत्तेची खुर्ची गेल्यानंतर होणारा थयथयाट आहे, अशी बोचरी टीका भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली. कांदिवली पूर्व येथे भाजपाच्या वतीने माफी मांगो आंदोलनात ते बोलत होते.


"सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील संत, सज्जन आणि महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी १२ व्या शतकात विज्ञानाधिष्ठित मानवतेची आणि समभावाची शिकवण दिली, संत तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली, त्यांचा अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे यांची उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील प्रत्येकासाठी प्रति परमेश्वर आहेत. त्यांचाही संजय राऊत आणि अमोल मिटकरी यांनी अपमान केला आहे, त्यानंतर साधा खुलासा आणि माफी सुद्धा मागितली नाही. हा त्यांचा माज जनता उतरल्याशिवाय राहणार नाही," असा घणाघात भातखळकरांनी केला.


महाविकास आघाडीच्या महामोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपतर्फे आज मुंबईत माफी मांगो आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन परस्परविरोधी मोर्चांमुळे मुंबईत आज वातावरण ढवळून निघाले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन केले.


https://twitter.com/BhatkhalkarA/status/1604004017860145152

कांदिवलीत भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली माफी मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी अतुल भातखळकर म्हणाले, सुषमा अंधारे व संजय राऊत यांना माफी मागावीच लागेल. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदूत्ववादी म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी संजय राऊत व सुषमा अंधारे यांना अजूनही पक्षात कसे ठेवले, याचे उत्तर द्यावे.


अतुल भातखळकर म्हणाले, महाविकास आघाडीच्या मोर्चाचे खरे स्वरुप जनतेसमोर आणण्याकरीता आम्ही हे माफी मांगो आंदोलन करत आहोत. येत्या हिवाळी अधिवेशनात खासदार संजय राऊत व सुषमा अंधारे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही हिवाळी अधिवेशनात ठराव करणार आहोत.

Comments
Add Comment

महापालिका म्हणतेय, गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईच्या हवेतील गुणवत्तेत सुधारणा

समीर ऍप आणि संकेतस्थळाच्या आकडेवारीच्या आधारे केला महापालिकेला दावा मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण

सोने तस्करीसाठी मुंबई विमानतळ मुख्य केंद्र! काय सांगतो डीआरआयचा अहवाल? जाणून घ्या सविस्तर

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च

नवी मुंबई विमानतळाची तिसऱ्या धावपट्टीकडे वाटचाल

सिडकोकडून सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दीर्घकालीन

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार? एकाच तारखेसाठी सत्ताधारी आणि विरोधक आग्रही

मुंबई: महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आणि मुंबई पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांची रणनीती सुरू