
राज्यात ठिकठिकाणी आंदोलन; पाकिस्तानचा झेंडा जाळला
मुंबई/पुणे : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून भाजपने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त केला. आज पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करत कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.
https://twitter.com/cbawankule/status/1604014051591213056
अलका टॉकीज चौक येथील निषेध आंदोलनात भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राजेश पांडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, युग पुरुष असलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता भारतात येऊन बॉम्ब स्फोट करता येत नाही. अतिरेक्यांना पाठिंबा देता येत नाही. भारतात दहशतवादी कारवाया करता येत नाही. पाकिस्तान हतबल झालाला आहे. भारतीय संस्कृती जगात नेण्याचे काम पंतप्रधान करत असून त्याबाबत पाकिस्तानला अडचण वाटत आहे. भुट्टो यांच्यापर्यंत आमचे जोडे पोहचत नाही, हे दुःख आहे. पाकिस्तानची घरात शिरून मारू, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.