Wednesday, April 30, 2025

ताज्या घडामोडीठाणे

House for less money : कमी पैशांत घर मिळवून देतो सांगणाऱ्यास अटक

House for less money : कमी पैशांत घर मिळवून देतो सांगणाऱ्यास अटक

ठाणे (प्रतिनिधी) : गरजू लोकांना सरकारी योजनेतून १५ लाखांत घर मिळवून देतो, (House for less money) असे भासवून ठाण्यातील ४३ वर्षीय रिक्षाचालक अशोक खोपकर यांच्याकडून दोन लाख रुपये घेत, त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी सौरभ वर्तक याला अटक केली आहे.

रिक्षाचालक खोपकर हे रिक्षाचे मिळेल तसे भाडे घेवुन प्रवासी लोकाना त्याच्या ठिकाणी सोडत. ठाणे ममहानगर पालिका येथील रिक्षा स्टँड येथून अटकेतील सौरभ वर्तक नामक प्रवाशाला ठाण्यातील धर्मवीर नगर येथे सोडत, त्यातून खोपकर यांची वर्तक याच्याशी ओळख झाली. दरम्यान वर्तक याने त्यांना आपण गरजू लोकांना सरकारी योजनेतून घर मिळवून देण्याचे काम करतो, मी बीएसयुपी योजने मधून लोकांना घरे मिळवून दिली आहेत. त्यामुळे खोपकर यांनी देखील त्यांना राहण्यासाठी घराची गरज असल्याचे सांगितले.

तेव्हा वर्तक याने त्यांना कमी पैश्यात म्हणजे १५ लाखात घर घेवुन देतो. माझी महानगर पालिकेत ओळख असून मी तुम्हांला घराचे संपूर्ण ताबा पत्र, तयार करून देईन, ज्या बिल्डींगमध्ये ज्या नंबरचा रूम तुम्हाला पाहिजे आहे त्याचे कागद पत्र संपूर्ण तयार करून देईल असे सांगितले. त्यासाठी दोन लाख रुपये अँडव्हान्स दयावे लागतील असे सांगितले. त्यानुसार खोपकर यांनी वर्तक याला १७ जानेवारी २०२० रोजी RTGS / NEFT व्दारे पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर सौरभ वर्तक यास घरा बाबत विचारणा केली असता तो अजून पेपर वर्क चालु आहे, असे सांगत होता.

त्यानंतर रूम बाबत तगादा लावल्याने त्याने मला धर्मवीर नगर येथील त्याचे राहते घराजवळ बोलाविले १३ जानेवारी २०२० रोजीचा संदर्भ क्र.ठामपा/श. ह.वि/कार्या. अधि. १५५४ अशी ताबा पावती मला दिली. त्यानुसार ते त्या रूमची पाहणी करण्यासाठी गेलो असता तो रूम बंद असल्याची लक्षात आले. तेव्हा त्यांनी ठाणे महानगर पालिकेत जाऊन त्या बाबत चौकशी केली असता ती ताबा पावती खोटी असल्याचे सांगण्यात आले.

फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. त्यानुसार वर्तक याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संगम पाटील करत आहेत.

Comments
Add Comment