Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

डॉ. आंबेडकर यांच्या जन्माबाबतच्या खोट्या दाव्याने महापुरुषांचा अपमान

डॉ. आंबेडकर यांच्या जन्माबाबतच्या खोट्या दाव्याने महापुरुषांचा अपमान

भाजप आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर घणाघात

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात महापुरुषांबाबत अवमानाचा मुद्दा तापलेला असतानाच खुद्द शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे टीकेची झोड उठली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला, असे संजय राऊत म्हणाले होते. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे यांना माहीत नाही काय? त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला. बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झालेला नाही. हा महापुरुषांचा अपमान नाही का? माफी मागा!!!’ असे ट्वीट करत आमदार नितेश राणे यांनी राऊतांना धारेवर धरले आहे.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला’, असे संजय राऊत म्हणाले. मुळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला नसून त्यांच्या जन्म मध्य प्रदेश राज्यातील महू या गावात झाला आहे. त्यामुळे राऊतांनी केलेल्या खोट्या दाव्यामुळे विरोधकांनी राऊतांविरोधात रान उठवले आहे.

आमदार नितेश राणे यांनी एक व्हीडिओ शेयर केला आहे. त्यात संजय राऊत पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत. पत्रकारांना प्रतिक्रिया देत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे राऊत बोलून गेले. याच वक्तव्यावरून राऊतांना धारेवर धरले आहे. कारण संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य साफ चुकीचे आहे. मुळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावात झाला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा