मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. १२वीची लेखी परीक्षा ४ मार्च रोजी, तर १०वीची लेखी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. परीक्षा रद्द करण्यात आल्या. ऑनलाइन वर्ग करण्यात आले. राज्यात नुकत्याच शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर १०वी, १२वीच्या बोर्डाच्या परीक्षांचा मुहूर्त ठरला असून, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एका व्हीडिओच्या माध्यमातून घोषणा केली आहे.
गेल्यावर्षी कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यावर्षी १२वीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल, तर १०वीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये होईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.