मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. सुकेश चंद्रशेखर याने २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सहआरोपी जॅकलिनविरुद्ध आज न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र ईडीच्या विनंतीवरून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ईडीच्या विनंतीवरून या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेश बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.