Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाFaharoz Cup : ठाण्याच्या क्रिशा शहाला सुवर्णपदक

Faharoz Cup : ठाण्याच्या क्रिशा शहाला सुवर्णपदक

ठाणे (वार्ताहर) : ठाणेकर आर्टिस्टिक जिम्नॅस्ट क्रिशा जतीन शहाने इजिप्तची राजधानी कैरो येथे झालेल्या फहारोझ कप (Faharoz Cup) आंतरराष्ट्रीय आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भरीव कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली.

प्री ज्युनियर गटासाठी जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या या स्पर्धेत क्रिशाने टेबलव्हॉल्ट प्रकारात अव्वल स्थान मिळवले. यात क्रिशाने ११.८५० गुणांची कमाई करताना सुकारा प्रकाराचे (हवेत कोलांटी उड्या मारून कुठलीही चूक न करता जमिनीवर पाय टेकवले जातात) अचूक सादरीकरण करत इतर स्पर्धकांना मागे टाकले. फेडरेशन इंटरनॅशनल जिम्नॅस्टिक्स यांच्या मान्यतेने इजिप्त जिम्नॅस्टिक्स फेडरेशनने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत ८ देशांतील १८२ युवा जिम्नॅस्ट सहभागी झाले होते.

जिम्नॅस्टिक्स सेवाभावी संस्थेतर्फे पाच जणांचा संघ स्पर्धेत उतरला होता. त्यात क्रिशाने सुवर्णपदक जिंकले. याआधी मायदेशात विविध राष्ट्रीय, राज्यपातळीवर आपली छाप पाडणारी क्रिशा ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुल येथे सकाळ आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात महेंद्र बाभुळकर आणि प्रणाली मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाचा कसून सराव करते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -