परभणी : गंगाखेड-राणीसावरगाव मार्गावर भीषण अपघात (Parbhani accident) झाला आहे. शैक्षणिक सहल घेऊन जाणारी बस आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले असून यातील ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल घेऊन जाणारी स्कूल बस चाकूरकडे जात होती. याच वेळी अहमदपूर येथून बुलढाण्याच्या जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली असता दोन्ही बसची समोरासमोरच धडक झाली. ज्यात दोन्ही बसमधील २२ जण जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.