देशाचे भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषणातून अनेक वेळा “अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाही, तर येथील रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका श्रीमंत आहे” असं सांगतात. हे सत्य स्विकारूनच गेल्या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातील पायाभूत सुविधांवर भर देऊन देशभरात रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. त्यामुळे देशात औद्योगिक व कृषिक्रांतीचे वारे वाहू लागले आहेत. आज देशातील रस्त्यांना रक्तवाहिन्यांचे महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतमाला योजनेअंतर्गत आज देशात ४४ आर्थिक कॉरिडॉर विकसित केले जात आहेत.
सात लाख १५ हजार कोटींच्या भारतमाला योजनेअंतर्गत या प्रकल्पांपैकी मुंबई-कलकत्ता (१८५४ कि.मी) मुंबई-आग्रा-९६४ कि.मी व सूरत-नागपूर (५९३ कि.मी) हे तीन आर्थिक कॉरिडॉर महाराष्ट्रात असून याचा फायदा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला होणार आहे. भारतमाला योजनेअंतर्गत १४ आंतर कॉरिडॉर निर्माण करण्यात येणार असून देशातील ३५ शहरातून लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील नाशिक शहराच्या समावेश आहे. याशिवाय पायाभूत सुविधामधील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर minecraft modpureहा तर आर्थिक विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. दळणवळण हे समृद्धीचे महत्त्वाचे साधन असून देशाच्या समांतर प्रगतीसाठी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोदी सरकारने जाणीवपूर्वक प्रयत्न चालिवले आहेत. महाराष्ट्रातही युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-पुणे allwindows4uएक्सप्रेस हायवे बांधून देशासमोर महामार्ग बांधणीचा एक नवा आदर्श निर्माण केItalianoproला. पुढे अटलजींच्या काळातही महामार्ग बांधणीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला. २०१४ नंतर मोदी सरकारने तर महामार्ग निर्मितीचा विक्रम केला आहे. आज जगात सर्वाधिक लांबीचे महामार्ग निर्माण करणारा भारत एकमेव देश ठरला आहे.
महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी
२०१४ साली राज्यात भाजप सेना युतीचं सरकार आले. अत्यंत कल्पक व सातत्याने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक तरुण अभ्यासू व धाडसी मुख्यमंत्री लाभला. महाराष्ट्राच्या विकासासाठी औद्योगिक विकासाबरोबर शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक योजना आखून त्यांची अंमलबजावणी केली. विशेषतः विदर्भ-मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रसारख्या अविकसित भागाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले व त्या भागाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या अविकसित भागाच्या विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेला अत्यंत व्हिजनरी व महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ होय. मुंबई ही जागतिक कीर्तीची बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात नागपूर-औरंगाबाद-मुंबई-पुणे ही मुख्य बाजारपेठा असलेली शहरे आहेत. या शहरांना जोडत ग्रामीण भागातून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची आखणी केली. ३० नोव्हेंबर २०१५ रोजी या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली. नागपूर-मुंबई एकूण ७०१ कि.मी. लांबीच्या या मार्गाचा फायदा महाराष्ट्रातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना होणार असून नागपूर, वर्धा, अमरावती, वाशीम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक व ठाणे या दहा जिल्ह्याबरोबर १४ जिल्हे इंटरचेंजेस माध्यमातून जोडले जाणार आहेत. यातील वर्धा व जालना येथे भव्य ड्रायपोर्ट उभारले जात आहेत. त्यामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांना या महामार्गाचा लाभ होणार आहे.
समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये
७०१ किमी लांबीच्या या महामार्गाची रुंदी १२० मीटर असून या महामार्गावर ७०० अंडर पासेस, ६५ उड्डाणपूल, २७४ लहान पूल, ८ रेल्वेब्रीज आणि ३२ वे साईड अॅमिनिटीज सेंटर असणार आहेत. ७०१ किमीचे हे अंतर तासी १५० किमी वेगाने सहा ते आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. कोरिया, जर्मनी, जपान या विकसित देशात जाऊन आलेले अनेकजण तेथील रस्त्यांचे तोंडभरून कौतुक करत तो देश किती महान आहे, हे अभिमानाने सांगत. आता जगातील लोकांनी आमच्या समृद्धी महामार्गाचे तोंडभरून कौतुक करावे इतका सर्व सुविधांसह सुंदर महामार्ग महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महाराष्ट्रात साकारात आहे. याच महामार्गाला त्यावेळच्या विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला होता. मात्र सत्तांतर होताच समृद्धीचे श्रेय घ्यायला जराही त्यांनी संकोच केला नव्हता.
ग्रीन फिल्ड महामार्ग
हा महामार्ग केवळ दळणवळण सुविधेसाठी निर्माण झालेला नसून महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी निर्माण करण्यात आला आहे. या महामार्गाची रचनाच इतकी सुंदर आहे की, देवेंद्र फडणवीसांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला सहज सलाम करावा वाटतो. प्रवास सुखकर तर असावाच; परंतु सुखदही व्हावा म्हणून महामार्गाचे सौंदर्य वाढविण्यासाठी संपूर्ण महामार्ग शीतल वाटावा म्हणून रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बारा लाख वृक्ष व फुलझाडांची लावड केली जात आहे. भारतीय रस्ते परिषदेच्या निकषाप्रमाणे प्रती किमी ६०० झाडे लावावी लागतात; परंतु समृद्धी महामार्गावर प्रती किमी १३२६ झाडे लावली जात आहे. वाटेतील तानसा, काटेपूर्णा, कारंजा या अभयारण्यातील प्राण्यांना कोणतीही इजा पोहोचू नये यासाठी तेथे महामार्गाची रुंदी वाढवून मुक्त प्राण्यांची काळजी घेतली आहे. बहुतांश मार्ग ग्रामीण भागातून जात असल्याने शेकऱ्यांच्या गुरा-ढोरांचे नुकसान होऊ नये म्हणून ७०० अंडर पास आणि ओव्हर पासेस निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यजीव व पर्यावरणाचे रक्षण होणार आहे.
शेतकऱ्यांचे भविष्य बदलवणारा महामार्ग
वास्तविक पहता ७०१ किमी लांबीच्या या महामार्गासाठी ८३११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून एकूण २३,५०० शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात बाजारभावाच्या पाचपटप्रमाणे साडेसात हजार कोटी रुपये खरेदी झाल्यापासून एक ते चोवीस तासांच्या आत त्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसने रकमा जमा करण्यात आल्या आहेत. भूसंपादनाची ही किचकट व अवघड प्रक्रिया अवघ्या आठ महिन्यांत पूर्ण करण्यात आली. केंद्र शासनाच्या २०१४च्या महाराष्ट्र सरकारच्या २०१७ च्या कायद्यामुळे हे शक्य झाले, नाही तर पूर्वीच्या सरकारने संपादन केलेल्या जमिनीचे अत्यंत अपुरे पैसेही मिळायलाही वीस-वीस वर्षे लागले आहेत.
संकल्पनाच निराळी
आतापर्यंत जगात जेवढे महामार्ग निर्माण करण्यात आले आहेत, त्या सर्व महामार्गापेक्षा या महामार्गाची संकल्पनाच निराळी आहे. प्रवास सुखकर व सुखद व्हावा या बरोबरच त्या भागाची समृद्धी, तेथील लोकांची आर्थिक प्रगती व रोजगार निर्मिती हे मुख्य उद्देश ठेवून समृद्धीची रचना करण्यात आली आहे.
कृषी समृद्धी केंद्रे
या महामार्गावर १८ कृषी समृद्धी केंद्रे विकसित केली जात असून याचा फायदा ३९२ गावांना होणार आहे. या कृषी केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या गरजा भागविण्यासाठी विविध उद्योग, शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्यात येणार असून त्यासाठी कौशल्य विकास केंद्र, आयटीआय, शाळा, कॉलेज, हॉटेल अशा उपक्रमांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच लोणार सरोवर, वेरुळ अंजिठा, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबाद पेंच प्रकल्प या सारख्या पर्यटन व तीर्थक्षेत्री येणाऱ्या पर्यटकांची सोय होणार असून पर्यटन व्यवसायालाही मोठी मदत होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारत असलेला हा महत्त्वकांक्षी प्रकल्प ज्यांच्या मंत्री काळात आकारास आला ते एकनाथ शिंदे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, म्हणून महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने हा ‘महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ महत्त्वकांक्षी प्रकल्प, तर आहेच; परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणून दोघेही या महामार्गाकडे महाराष्ट्राचे भविष्य म्हणून पहात आहेत. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५२० किमी नागपूर ते शिर्डी मुख्यमंत्र्यांना शेजारी बसवून स्वतः गाडी चालवत पाहणीचा व प्रवासाचा आनंद घेतला. देशभरात ज्यांनी मुलभूत सुविधांचे जाळे निर्माण केले.
ज्यांच्या हाती संपूर्ण भारताने आपले भविष्य दिले आहे, ते देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील या महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे होत आहे. या प्रकल्पास उद्घाटन समारंभास मनःपूर्वक शुभेच्छा!
-गणेश हाके