मुंबई (वार्ताहर) : रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी पश्चिम, मध्य आणि हार्बर या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण पाचवी-सहावी मार्गिकेवर, तर हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते वांद्रे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : ठाणे ते कल्याण पाचवी-सहावी मार्गिका
कधी : सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत
परिणाम : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, १३२०१ पाटणा-एलटीटी एक्स्प्रेस, काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे वेळेनुसार १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. काही मेल-एक्स्प्रेस गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली ते गोरेगाव धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सेवा बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय लोकल सेवा रद्द केल्या जातील.
हार्बर रेल्वे
कुठे : चुनाभट्टी ते वांद्रे हार्बर मार्ग
कधी : सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी आणि वडाळा रोड येथून वाशी / बेलापूर / पनवेलकरिता आणि सीएसएमटीहून वांद्रे / गोरेगावकरिता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सीएमएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.