Saturday, May 17, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

Measles : मुंबईत गोवरचा उद्रेक; बाधित रुग्णांची संख्या ४५७

Measles : मुंबईत गोवरचा उद्रेक; बाधित रुग्णांची संख्या ४५७

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील गोवंडी परिसरातून पसरणाऱ्या गोवरचा (Measles) विळखा आता मुंबईसह संपूर्ण महामुंबईला बसत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील २४ वॉर्डापैकी १७ वॉर्डात गोवरचा फैलाव झाला आहे. तर १७ वॉर्डामध्ये ३१२ भागांत गोवरचा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


शनिवारी दिवसभरात १० नवीन रुग्णांची नोंद झाल्याने बाधित रुग्णांची संख्या ४५७ वर पोहोचली आहे. तर ५१ संशयित रुग्ण आढळल्याने संशयित रुग्णांची संख्या ४,८९० वर पोहोचली आहे. दरम्यान, गोवर बाधित रुग्ण संख्येत होणारी वाढ मुंबईकरांसह आरोग्य विभागाच्या चिंतेत भर टाकणारी आहे.


ऑक्टोबर सप्टेंबर महिन्यात गोवरचा झपाट्याने प्रसार होत गेला. आतापर्यंत १५ मुलांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ३ मुले मुंबई बाहेरील असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. कुलाबा, भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, माहीम, गोवंडी, अंधेरी, मालाड, कुर्ला आदी भागांत गोवरचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या भागात आरोग्य विभागाने मुलांच्या लसीकरणावर भर दिला आहे.




  • शनिवारी दिवसभरात ५१ संशयित रुग्णांची नोंद

  • दिवसभरात ३५ रुग्णांना डिस्चार्ज

  • आतापर्यंत ४० रुग्ण उपचारासाठी दाखल

  • एकूण घरांचे सर्वेक्षण - ८२ लाख ५७ हजार २९२

Comments
Add Comment