पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले असता त्यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली.
यावेळी पोलिसांनी शाई फेकणाऱ्या व्यक्तीला लगेचच ताब्यात घेतले. त्या व्यक्तीचे नाव अद्याप समजलेले नाही.
चंद्रकात पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचे विद्यार्थी आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील घोषणाबाजी करत भर रस्त्यात त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला.
चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमादरम्यान होणाऱ्या संभाव्य गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्त करण्यात आला होता. महापुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता होती. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या घराजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. असे असतानाही चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर एका व्यक्तीने शाईफेक केली. या घटनेचा भाजपकडून निषेध व्यक्त केला जात आहे.