Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीteachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा

teachers : शिक्षकांनाही द्यावी लागणार आता दरवर्षी परीक्षा

शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने विभागीय आयुक्तांचा निर्णय

औरंगाबाद : विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना (teachers) देखील आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षणाचा दर्जा ढासळल्याने मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयांवर सर्वेक्षण करण्यात आले, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रकर यांनी सांगितले. त्यामुळे यापुढे आता शिक्षकांना देखील परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.

याबाबत बोलतांना केंद्रकर म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर आम्ही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा स्तर तपासाला असता, त्यात प्रमाण खूपच खालवला गेल्याचे समोर आले. त्यात शाळा बंद होत्या आणि ऑनलाइन शिक्षणाचा विशेष काही परिणाम झाला नाही असे आमचे मत आहे. शाळेत जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी अनेक ठिकाणी शिक्षकांना त्यांच्याच विषयात पारंगतच नसल्याचे समोर आले. फार कमी शिक्षक होते की, ते त्यांच्या विषयात पारंगत होते. त्यामुळे शिक्षकांची देखील परीक्षा घेतली पाहिजे असा निर्णय घेतला असल्याचे केंद्रकर म्हणाले.

लातूर जिल्ह्यात जेव्हा सर्वेक्षण करण्यात आले त्यावेळी आठवीच्या ४५ टक्के मुलांना भागाकार देखील करता येत नव्हता. लातूर जिल्ह्याचे सीईओ अभिनव गोयल खूप चांगले काम करतात. मात्र त्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर इतर जिल्ह्यात देखील असणारच आहे. तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात वेगवेगळ्या विषयावर सर्वेक्षण करण्यात आले, सर्वच ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याचे जाणवले असल्याचे केंद्रकर म्हणाले.

पुढे बोलतांना केंद्रकर म्हणाले की, सद्या आम्ही पहिली ते दहावीच्या शिक्षकांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संस्था आणि त्यांच्या शिक्षकांची देखील परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच या परीक्षांचा स्तर कठीण असणार असून, सर्वच शाळेत अशी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत निगेटिव्ह मार्क असणार आहे. तसेच प्रश्नांना उत्तरांचे पर्याय दिले जाणार आहे. विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या परीक्षेवर अधिक भर असणार आहे. मात्र परीक्षा देणे बंधनकारक नसणार आहे. परंतु शिक्षकांनी या परीक्षा दिल्या पाहिजे, असा माझा आग्रह असणार असल्याचे केंद्रकर म्हणाले.

केंद्रकर यांच्या या निर्णयावर बोलताना शिक्षक म्हणाले की, केंद्रकर यांच्या निर्णयाचा शिक्षक म्हणून आम्ही स्वागत करत आहोत. शिक्षक असो किंवा समाजातील कोणताही घटक असो, त्यांनी अपडेट होणे गरजेचे आहे. परंतु शिक्षणाचा दर्जा खालावला याला फक्त शिक्षक मुख्य कारण असल्याचा दावा सत्य नाही. ऑनलाईन अभ्यास आल्यापासून अनेक प्रश्न निर्माण झाले असून, मुलांचे वाचन कमी झाले आहेत. अशी अनेक कारणे असली तरीही, केंद्रकर यांच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे शिक्षक म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -