Friday, July 11, 2025

Nashik temperature : थंडीचा कडाका वाढला

नाशिक (प्रतिनिधी) : थंडीचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. नाशिकचे तापमानामध्ये (Nashik temperature) ४.८ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे. जनजीवनावर देखील त्याचा परिणाम दिसून येत आहे.


सर्वसाधारण दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागते आणि नोव्हेंबर महिन्यपासून थंडीला सुरुवात होते. तर या काळामध्ये म्हणजेच डिसेंबर व दत्त जयंतीच्या काळात उत्तर महाराष्ट्रात थंडी पडलेली असते. यावर्षी चांगला पाऊस झाला त्यामुळे यावर्षी चांगली जोरदार थंडी पडेल, असा अंदाज बांधला जात होता. हवामान तज्ज्ञ देखील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करत होते; परंतु उत्तर भारताकडून वाहणारे थंड वारे या मुळे तापमानातील बदलामुळे संथ गतीने वारा वाहत आहे. असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम मागील आठवड्यात तापमानामध्ये वाढ झाली होती. नाशिक शहराच्या तापमानात मागील २४ तासात ४.८ अंश डिग्री सेल्सिअसने घट झाली आहे.


नाशिक शहराचे किमान तापमान १०.०० तर कमाल तापमान २८.९ हे मागील २४ तासात नोंदविण्यात आले आहे. गुरुवारी नाशिकचे तापमान घसरण्याचे कारण म्हणजे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवास सुरू झाल्यामुळे तापमान कमी होण्याचे कारण हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. मागील संपूर्ण आठवड्यामध्ये नाशिकचे तापमान वाढले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा