Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीmeasles : राज्यात गोवरचा धोका यंदा अधिक

measles : राज्यात गोवरचा धोका यंदा अधिक

गेल्या ३ वर्षांपेक्षा यावर्षी रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई (वार्ताहर) : गोवरच्या (measles) वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील आरोग्य विभागाची चिंता वाढवली आहे. राज्यात गेल्या ३ वर्षांपेक्षा यंदा गोवरच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

राज्यात आतापर्यंत १४ हजार ४४० गोवरचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ९४० रुग्णांना निश्चित गोवर झाल्याचे निदान झाले आहे, तर १७ बालकांचा गोवरमुळे मृत्यू झाला आहे. राज्यात मुंबई, मालेगाव, भिवंडी, ठाणे, पिंपरी चिंचवड हे जिल्हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्यात गोवरमुळे मुंबईत सर्वाधिक मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

राज्यात २०१९ मध्ये १३३७, २०२० मध्ये २१५०, २०२१ मध्ये ३६६८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यावर्षी ८ डिसेंबरपर्यंत १४ हजार ४४० संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. ९४० निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत, तर १७ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी मुंबईत ११, भिवंडीत ३, ठाण्यात २, तर वसई विरार येथे १ मृत्यू झाला आहे. एकूण १७ मृत्यूंपैकी ० ते ११ महिन्यांच्या ४, १२ ते २४ महिन्यांच्या १०, २५ महिने ते ६० महिने म्हणजे ५ वर्षांच्या २ तसेच ५ वर्षांवरील १ बालकाचा मृत्यू झाला आहे. १८ मृत्यूंपैकी ८ मुली तर ९ मुले आहेत.

मुंबईत ४७९३ संशयित रुग्ण असून ४४२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत, तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव मनपा येथे ९२२ संशयित रुग्ण असून ७१ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. भिवंडी मनपा येथे ९७८ संशयित रुग्ण असून ५३ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे मनपा येथे ७५६ संशयित रुग्ण असून ५० निश्चित निदान झाले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्हा येथे १५६ संशयित रुग्ण असून २७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. वसई – विरार मनपा येथे २६८ संशयित रुग्ण असून २४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत तर १ जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल मनपा येथे १९५ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. नवी मुंबई मनपा येथे २७५ संशयित रुग्ण असून १२ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

औरंगाबाद येथे १६५ संशयित रुग्ण असून १५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड येथे ३४४ संशयित रुग्ण असून ८ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. बुलढाणा येथे ७२ संशयित रुग्ण असून ५ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. मीरा भाईंदर येथे १८२, संशयित रुग्ण असून ४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. रायगड येथे १३८ संशयित रुग्ण असून १४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. जळगाव पालिका येथे १६९, संशयित रुग्ण असून ४ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. धुळे पालिका येथे ६९ संशयित रुग्ण असून ९ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. धुळे येथे ९२ संशयित रुग्ण असून ७ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत. उल्हासनगर येथे ७७ संशयित रुग्ण असून २ निश्चित निदान झालेले रुग्ण आहेत.

१६ लाख ९७ हजार घरांचे सर्व्हेक्षण

राज्यात गोवर प्रभावित विभागात १२२८ सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. १६ लाख ९७ हजार ६०२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ४६ हजार ३६७ बालकांना व्हिटामिन ए चा डोस देण्यात आला आहे. गोवर रुबेलाचा १९,८४५ बालकांना पहिला, तर १०,८७९ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात नोव्हेंबर अखेरपर्यंत एकूण १३ लाख ५३ हजार ८२० लसींचा साठा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -