Saturday, August 30, 2025

Crime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या

Crime : संपत्तीसाठी मुलाने केली आईची हत्या

मुंबई : मुंबईमध्ये जुहू परिसरात एका मुलाने संपत्तीसाठी नोकराच्या मदतीने स्वत:च्या आईची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना (Crime) उघडकीस आली आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी मुलगा सचिन कपूर आणि नोकर छोटू उर्फ ​​लालूकुमार मंडल या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीणा कपूर असे मृत आईचे नाव असून तिचे वय ७४ वर्षे होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये मालमत्तेवरून वाद झाला होता. यामुळे मुलाने नोकर छोटूशी हातमिळवणी करून स्वतःच्या आईची हत्या केली. पुरावे नष्ट करण्यासाठी आईचा मृतदेह एका बॉक्समध्ये भरला. घराचे सीसीटीव्ही फुटेज ठेवलेले डीव्हीआर काढले आणि तेही नष्ट केले. त्यानंतर आरोपींनी बॉक्समध्ये पॅक केलेला वीणाचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माथेरान भागातल्या दरीत फेकून दिला.

यानंतर ६ डिसेंबर रोजी आरोपी मुलगा त्याची आई हरवल्याची तक्रार घेऊन आला होता, ज्यामध्ये त्याने आई बेपत्ता असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात हे दोघे एक मोठा बॉक्स इकडे तिकडे हलवत असल्याचे समजले. त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी खुनाबाबत माहिती दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा