Monday, October 27, 2025
Happy Diwali

Karnataka : कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्यांना पुन्हा काळे फासले!

Karnataka : कर्नाटक सीमेवर महाराष्ट्राच्या गाड्यांना पुन्हा काळे फासले!

बेळगाव : राज्यात सीमावादाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच कर्नाटकमधील (Karnataka) काही संघटनांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वाहनांना काळे फासले. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.

कर्नाटकचे समर्थन करणाऱ्या काही संघटनांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वाहनांना अडवले. त्यांनी कर्नाटकमधील गडाग जिल्ह्यात महाराष्ट्राच्या वाहनांना काळे फासले. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी तर वाहनांवर चढून आंदोलन केले.

कर्नाटकच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षांकडून सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपावर सडकून टीका केली जात आहे. सीमाप्रश्नावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. तर महाराष्ट्र-कर्नाटक सीमप्रश्न हाताळता येत नसेल तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकून केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा