Monday, May 12, 2025

देशमहत्वाची बातमी

Swiggy : झोमॅटो पाठोपाठ स्विगीच्या शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

Swiggy : झोमॅटो पाठोपाठ स्विगीच्या शेकडो कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात

मुंबई : झोमॅटो पाठोपाठ आता स्विगी (Swiggy) कर्मचाऱ्यांमध्ये मोठी कपात करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आर्थिक समस्येचा सामना करावा लागत असल्याने कंपनी सध्या २५० कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता आहे. पण हा आकडा पुढे वाढू शकतो.


स्विगी ही भारतीय फूड डिलिव्हरी ॲप कंपनी आहे. मात्र स्विगी कंपनी सध्या आर्थिक संकटामध्ये सापडली आहे. श्रीहर्शा मजेटी स्विगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.


सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, स्विगीचे एचआर प्रमुख गिरीश मेनन यांनी अलिकडेच कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित नोकरकपात होण्याची माहिती दिली. ब्रोकरेज फर्म जेफरीजच्या मते, स्विगी कंपनीला जानेवारी ते जून दरम्यान ३१५ दशलक्ष डॉलरचे नुकसान झाले आहे. इकॉनमिक टाइम्सच्या मीडिया रिपोर्टनुसार, स्विगीने ईमेलद्वारे यावर उत्तर देत सांगितले की, स्विगीकडून सध्या कोणतीही नोकरकपात करण्यात येणार नाही, पण भविष्यात कर्मचाऱ्यांनी हटवण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मीडिया रिपोर्टनुसार, स्विगीकडून ग्राहक सेवा विभाग (Customer Care Department), तंत्रज्ञान आणि उत्पादन विभागातून नोकरकपात होण्याची शक्यता आहे. स्विगीने नोव्हेबर महिन्यामध्ये दिल्लीमध्ये मोठं किचनही बंद केलं आहे. स्विगी निवडक लोकांमध्ये अधिक चोखपणे काम करण्याची योजना आखत आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर कर्मचाऱ्यांना रेटींग्स, बोनस किंवा कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात येईल, असं एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Comments
Add Comment