Friday, October 31, 2025
Happy Diwali

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात काँग्रेसचे सरकार; ऑपरेशन लोटसची भीती

शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) काँग्रेसने आश्चर्यकारकरित्या आघाडी घेतली असून त्यांचे उमदेवार ३८ जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपची २७ जागांपर्यंत खाली घसरण झाली आहे. हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर दिसून येत आहे. दोन्ही पक्ष अवघ्या काही मतांनी मागेपुढे आहेत.

हिमाचल प्रदेशात बहुमतासाठी ३५ जागांची आवश्यकता आहे. सध्याची परिस्थिती पाहता काँग्रेसला हिमाचल प्रदेशात सत्ता स्थापन करणे शक्य आहे. हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.

त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजपने अपक्षांना गळाला लावण्याच्या तयारी केली होती. मात्र, आता काँग्रेसने सरशी साधल्यामुळे भाजपकडून आता हिमाचल प्रदेशात 'ऑपरेशन लोटस' राबवले जाण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment