Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीGujarat : गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

Gujarat : गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

अहमदाबाद : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात (Gujarat) विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनुसार भाजप १५२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपचा हा विजय ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये भाजपला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपने एक्झिट पोल्सच्या अंदाजापेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसत आहे. सध्या भाजपने १५० जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार ८ जागांवर आघाडीवर आहेत. याचा मोठा फटका काँग्रेसला पक्षाला बसला आहे.

एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसल पक्षाला ४०च्या आसपास जागा मिळतील, असे सांगितले जात होते. परंतु, आता काँग्रेस पक्ष २० जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. यापूर्वी भाजपने गुजरात विधानसभेत सर्वाधिक १२७ जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदा भाजपकडून हा विक्रम मोडीत काढला जाऊन ऐतिहासिक विजय मिळवला जाण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -