repo rate : रेपो दरात वाढ; कर्ज महागणार!

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) (repo rate) आज तीन दिवसीय चलनविषयक धोरण समितीचे (एमपीसी) निर्णय जाहीर केले. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी समितीचे चलनविषयक धोरण जाहीर केले. यावेळी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज रेपो दरात ०.३५ टक्क्यांनी वाढ केल्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर ६.२५ टक्के झाला आहे.


शक्तिकांत दास यांनी सांगितले की एमपीसीच्या ६ पैकी ५ सदस्यांनी रेपो दरात बहुमताने वाढ करण्यास समर्थन दिले आणि त्यानंतर आरबीआयने रेपो दर ०.३५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आरबीआयने सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली आहे.


गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "आम्ही आणखी एका आव्हानात्मक वर्षाच्या शेवटी आलो आहोत आणि केवळ देशातच नाही तर जगातील अनेक देशांनी महागाईचा दर वाढलेला पाहिला आहे. जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे देशातील पुरवठा साखळी परिस्थिती आव्हानांना तोंड देत आहे. चलनवाढीचा दर वरच्या स्तरावर असताना बँक पत वाढ सध्या दुहेरी अंकांच्या वर येत आहे."

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना