Thursday, July 25, 2024
Homeकोकणसिंधुदुर्गElections : सरपंचपदासाठी ११४४, तर सदस्यपदासाठी ५४६९ नामनिर्देशनपत्र वैध

Elections : सरपंचपदासाठी ११४४, तर सदस्यपदासाठी ५४६९ नामनिर्देशनपत्र वैध

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

सिंधुदुर्गनगरी (वृत्तसंस्था) : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Elections) सरपंच पदासाठी १ १४४, तर सदस्य पदासाठी ५ हजार ४६९ नामनिर्देशनपत्र वैध ठरली असून सरपंचपादासाठी ६, तर सदस्य पदासाठीची ५९ नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत.

सरपंचपदासाठी १ हजार १५०, तर सदस्य पदासाठी ५ हजार ५२८ नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. दरम्यान ७ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली.

तालुकानिहाय वैध व अवैध ठरलेली नामनिर्देशनपत्र पुढीलप्रमाणे :

कणकवली – ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र २२४, एकूण वैध नामनिर्देशनपत्र २२०, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ४. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ११०१, एकूण वैध नामनिर्देशनपत्र १ हजार ८३, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र १८.

वैभववाडी – ग्रामपंचायत संख्या १७, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ५१,एकूण वैध नामनिर्देशनपत्र ५१, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ०. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र २१४, एकूण वैध नामनिर्देशनपत्र २१४, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ०.

देवगड – ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ११०, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ११०, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ०. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ५००, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ४८७, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र १३.

मालवण – ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र १८२, एकूण वैध नामनिर्देशनपत्र १८२, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ०. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ८४८, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ८४५, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ३.

कुडाळ – ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र १९८, एकूण वैध नामनिर्देशनपत्र १९७, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र १. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र १ हजार ७५, एकूण वैध नामनिर्देशनपत्र १ हजार ५९, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र १६.

सावंतवाडी – ग्रामपंचायत संख्या ५२, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र १८६, एकूण वैध नामनिर्देशनपत्र १८५, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र १. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ९१७, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ९१४, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ३.

वेंगुर्ला – ग्रामपंचायत संख्या २३, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र १०४, एकूण वैध नामनिर्देशनपत्र १०४, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ०. सदस्यपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ४८४, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ४८१, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ३.

दोडामार्ग – ग्रामपंचायत संख्या २८, सरपंचपदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ९५, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ९५, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ०. सदस्य पदासाठी एकूण दाखल नामनिर्देशनपत्र ३८९, एकूण वैध नामनिर्देशनपत्र ३८६, अवैध ठरलेली एकूण नामनिर्देशनपत्र ३.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -