Wednesday, July 2, 2025

Fraud : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयाचे समन्स

Fraud : फसवणूक प्रकरणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना न्यायालयाचे समन्स

बेगुसराय : बिहारमध्ये योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांच्या विरोधात फसवणूक (Fraud) प्रकरणी समन्स जारी करण्यात आले असून १२ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.


बेगुसराय जिल्हा न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी मोहिनी कुमारी यांनी निंगा गावातील रहिवासी तक्रारदार महेंद्र शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रार पत्रावर सुनावणी करताना योगगुरू बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांना कलम ४२० आणि ४१७ अंतर्गत समन्स बजावण्याचे आदेश दिले.


शर्मा यांनी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण यांच्याविरोधात सीजीएम कोर्टात तक्रार दाखल केली आहे. पैसे घेऊनही उपचार केले जात नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेंद्र शर्मा यांनी योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावर आरोप केलाय की, आम्ही उपचारासाठी पतंजली आयुर्वेद प्रायव्हेट लिमिटेड, महर्षी कॉटेज योग, ग्राम झुलामध्ये एकूण ९०,००० रुपये जमा केले होते. माझा मुलगा नरेंद्र कुमार याच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले होते. पैसे जमा केल्यानंतर मी, माझा मुलगा आणि पत्नी पतंजलीनं दिलेल्या तारखेनुसार आणि वेळेत उपचार करण्यासाठी तिथं गेलो. परंतु, तिथं आम्हाला तुमचे पैसे जमा झाले नसल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, साक्षीदारांनी दिलेल्या जबाबानंतर न्यायालयानं योगगुरू बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्या विरोधात पुराव्याची दखल घेत दोन्ही आरोपींना १२ जानेवारी २०२३ पर्यंत न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

Comments
Add Comment