Friday, July 19, 2024
Homeक्रीडाICC Player of the Month : ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी बटलर, रशीद,...

ICC Player of the Month : ‘प्लेयर ऑफ द मंथ’साठी बटलर, रशीद, आफ्रिदीला नामांकन

लंडन (वृत्तसंस्था) : नोव्हेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूचे नामांकन (ICC Player of the Month) मिळाले आहे.

इंग्लंडचा जोस बटलर, आदिल रशीद आणि पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना त्यात स्थान दिले आहे. या तिघांपैकी एका खेळाडूला आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे. महिन्याभरात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या एका खेळाडूला आयसीसीतर्फे गौरविण्यात येते. त्यानुसार आयसीसीने नोव्हेंबर महिन्यातील दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे नामांकन दिले आहे.

इंग्लडचा मर्यादीत षटकांचा कर्णधार जोस बटलरने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्यामुळे त्याच्या संघाला आयसीसी पुरुषांचा टी-२० विश्वचषक जिंकता आला. इंग्लंडचा आदिल रशीदने सर्वात लहान फॉरमॅटमध्ये जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून स्वत:ला वारंवार सिद्ध केले आहे. तसेच टी-२० विश्वचषक २०२२ विजेत्या इंग्लंड संघाचा भाग होता. त्याने अंतिम फेरीच्या सामन्यात २२ धावा देताना दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानच्या गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने हा विश्वचषक गाजवला. त्याने महिन्याभरात ७.३०च्या प्रभावी सरासरीने दहा विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने २२ धावा देताना चार विकेट्स घेतल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -