Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीAir pollution : धुके नव्हे धुलीकण; मुंबईतील हवेतील स्तर ‘वाईटच’

Air pollution : धुके नव्हे धुलीकण; मुंबईतील हवेतील स्तर ‘वाईटच’

२९३ एक्यूआयची नोंद

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील धुसर वातावरण (Air pollution) क्षणभर प्रत्येकाला धुक्यांचा भास देऊन जाणारे ठरत आहे. मात्र, हे धुके नव्हे तर धुली कण असल्याने मुंबईच्या हवामानावर ते परिणाम करणारे ठरत आहेत. मुंबईत गेल्या आठवडाभरापासून हवेतील स्तर ढासळत असून अद्यापही सुधारणा झालेली नाही. तर सकाळी मुंबईत अनेक ठिकाणी धुकेसदृश्य वातावरण दिसून येते मात्र ते धुके नसून धुली कण आहेत. यामुळे सध्या सर्दी खोकला घसा दुखण्याचे प्रमाणही मुंबईत वाढले आहेत.

दरम्यान मुंबईत २९३ एक्यूआय सह हवेचा स्तर ‘वाईट’ नोंदवला गेला आहे. तर मुंबईतील कुलाबा, मालाड, माझगाव, बीकेसी, अंधेरी भागातील हवेची स्थिती अत्यंत खराब असून या परिसरात ‘अतिशय वाईट’ हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.

यात माझगाव येथे हवेचा स्तर सर्वाधिक खराब आहे. येथे ३८१ एक्यूआयची नोंद झाली आहे. त्यानंतर मालाड येथे ३२३, कुलाबा ३०९, बीकेसी ३०९ आणि अंधेरी ३०३ एक्यूआय ची नोंद झाली. सध्या हवेचा स्तर खराब झाल्यामुळे हे सर्व परिसर ‘रेड झोन’ मध्ये आहेत. तर वरळी आणि बोरिवली येथे १९० आणि १७३ हवेचा स्तर नोंदवला असून हा स्तर मध्यम आहे. तर दुसरीकडे मुंबईत सकाळी धुके पसरलेले असतात मात्र हे धुके नाही, तर प्रदूषणामुळे असलेले धुळीचे कण आहेत. यामुळे वातावरण देखील धुसर दिसत आहे.

डिसेंबर महिना आणि थंडी असे एकंदरीत गणित दिसून येते. त्यामुळे धुक्याचा आभास निर्माण करणारे धुलीकण हे मानवी आरोग्यास तसे हानिकारकच आहेत. वातावरणातील हा बदल डोकेदुखी, सर्दी-खोकला, घसा दुखी वाढविणारी ठरत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -