Thursday, July 10, 2025

Ro-Ro Ship : रो रो पॅक्सची मांडवा जेट्टीला धडक

Ro-Ro Ship : रो रो पॅक्सची मांडवा जेट्टीला धडक

अलिबाग (वार्ताहर) : मांडवा येथून मुंबईकडे निघालेली रो रो बोट (Ro-Ro Ship) मांडवा बंदरात धडकून अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही. रो रो इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला.


मांडवा बंदरातून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रो रो बोट प्रवाशांना घेऊन गेटवेकडे निघाली होती. त्याचवेळी रो रोमधील एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून बोट जलवाहतूक करणाऱ्या दुसऱ्या धक्क्यावर जाऊन धडकली.


यावेळी कुठलीही जलवाहतूक धक्क्याला नव्हती, अन्यथा मोठा प्रसंग निर्माण झाला असता. मात्र या अपघातात दुसऱ्या धक्क्याला असलेल्या रेलिंगचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रो रो बोट ही पुन्हा धक्क्याला लावण्यात आलेली असली, तरी प्रवाशांमध्ये भीती दिसून आली़.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा