Tuesday, July 23, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणKonkan : प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही

Konkan : प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही

कोकणवासीयांना उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिला शब्द

मुंबई : “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात (Konkan) आणणार नाही” असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासीयांना दिला आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज गोरेगाव येथे करण्यात आले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी फडणवीस यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी प्रकल्पासंदर्भात बोलताना प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

कोकणाने काही लोकांना भरभरून दिले मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केले नाही. मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे कोकणाच्या विकासाकडे विशेष लक्ष आहे. कोकणाच्या विकासाचे धोरण ते आखत आहेत. कोकणामध्ये नवनवीन योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच, रिफायनरी संदर्भात पाच हजार एकरामध्ये ग्रीनरी करण्याची अट दिली होती. तिथे जवळपास रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता. काही लोकांना कोकणाचा विकास नकोय त्यांना कोकण हा मागास ठेवायचा आहे. आम्हाला मात्र कोकणाचा विकास करायचा आहे. त्यादृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. रिफायनरी प्रकल्प हा आम्ही कोकणामध्ये करणार आहोतच आणि जेणे करून लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असे म्हणत रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -