Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीmeasles : दिवसभरात गोवरच्या ८ नवीन रुग्णांची नोंद; ७१ संशयित रुग्ण

measles : दिवसभरात गोवरच्या ८ नवीन रुग्णांची नोंद; ७१ संशयित रुग्ण

मुंबई (वार्ताहर) : मुंबईतील वाढत्या गोवरच्या (measles) रुग्णसंख्येमुळे पालिकेची चिंता वाढली आहे. मंगळवारी दिवसभरात ८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या ४२० वर पोहोचली आहे. दिवसभरात ७१ संशयित रुग्णांची नोंद झाल्याने संशयित रुग्णांची संख्या ४,६५८ वर पोहचली आहे.

मुंबईत गोवरचा विळखा दिवसेंदिवस आवळत असून झोपडपट्टी भागांत गोवरचा उद्रेक झाला आहे. भायखळा, वरळी, वडाळा, धारावी, अंधेरी पूर्व, कुर्ला, भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर हे गोवरचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मंगळवारी दिवसभरात ७१ संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात २८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ४० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आतापर्यंत ७० लाख २२ हजार ३६५ घरांचे सर्वेक्षण झाले आहे.

कानपूर येथून आलेला मुलगा संशयित

दादर चैत्यभूमी येथे कानपूर येथून आलेल्या मुलाची रविवारी पालिका अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला गोवरचा संसर्ग असल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्या मुलाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता कुटुंबियांनी मुलास दाखल करण्यास नकार दिला. त्या मुलावर ओपीडीत उपचार केल्यानंतर कुटुंबियांनी मुलास पुन्हा कानपूरला नेल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

गोवरचा वाढता धोका लक्षात घेता चैत्यभूमी येथे पालिकेच्या जी उत्तर विभागाने आरोग्य तपासणीचे विशेष कॅम्प आयोजित केले होते. ३ ते ६ डिसेंबरपर्यंत ७,२१३ तपासण्या केल्या. आयोजित आरोग्य कॅम्पमध्ये तीन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी कार्यरत असून एका शिफ्टमध्ये १५० कर्मचारी कार्यरत आहेत. तर २५ रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्याचे जी उत्तर विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विरेंद्र मोहिते यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -