Sunday, June 15, 2025

Mission 2024 : भाजपचे 'मिशन २०२४' सुरू

Mission 2024 : भाजपचे 'मिशन २०२४' सुरू

नवी दिल्ली : गुजरात राज्याच्या विधानसभेसाठी निवडणूक सुरू असताना दुसरीकडे भाजपने २०२४ सालच्या लोकसभेसाठी तयारी (Mission 2024) सुरू केल्याचे दिसून येत आहे. लोकसभेची निवडणूक २०२४ मध्ये होणार असली तरी राजधानी दिल्लीत त्या दृष्टीने आज महत्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे 'मिशन २०२४' सुरू झाले आहे.


गुजरातमध्ये सकाळी मतदानाचे कर्तव्य पार पाडले आणि लगोलग पुढच्या दोन तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत दाखल झाले. एकीकडे गुजरातचे मतदान पार पडत असतानाच आणि त्याचे निकाल लागण्याआधीच भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसांच्या बैठकीला दिल्लीत सुरुवात झाली, त्यासाठी पंतप्रधानांनी तातडीने दिल्ली गाठली.


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या मुख्यालयात ही दोन दिवसांची बैठक पार पडत आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने याचा समारोप होणार आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय पदाधिकारी, सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, प्रभारी यांचीही उपस्थिती आहे.

Comments
Add Comment