Saturday, July 13, 2024
Homeराशिभविष्यसाप्ताहिक राशिभविष्यHoroscope : साप्ताहिक राशिभविष्य

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक (Horoscope) राशिभविष्य, दि. ४ ते १० डिसेंबर २०२२

नोकरी मिळेल
मेष – जे जातक नोकरीच्या शोधार्थ आहेत, अशा जातकांचा नोकरीविषयक शोध संपून नवीन नोकरी मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. चालू नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. पूर्वी दिलेल्या नोकरीविषयक मुलाखतीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. लहान-मोठे प्रवास होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक. व्यवसायात परिस्थिती ठीकठाक राहील. काही वेळेस कामाचा ताण जाणू शकतो. शांतपणे निर्णय घेणे आवश्यक. कुटुंबात शुभवार्ता मिळाल्याने आनंदी राहाल. अचानक धनलाभामुळे आश्चर्यचकित राहाल.
धनलाभाची शक्यता
वृषभ – समाजातील मान्यवर तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखी होऊन भेटीगाठी होतील. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली महत्त्वाची कार्ये पूर्ण होण्यासाठी या भेटीगाठी उपयोगी पडतील. मध्यस्थी यशस्वी होतील. जमीन व स्थायी संपत्ती संबंधित असलेली रखडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयी असलेले वाद-विवाद संपुष्टात येतील. सर्वमान्य तोडगा निघेल. भावंडांशी सख्य राहील. लहान-मोठे गैरसमज दूर होतील. जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. चांगल्या धनलाभाची शक्यता.
चांगल्या घटना घडतील
मिथुन – अनुकूल ग्रहमान लाभल्यामुळे अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. नेहमीच्या उत्पन्नाच्या मार्गांशिवाय उत्पन्न वाढू शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्चाला कात्री द्या. अनेक चांगल्या घटना घडून येतील. कुटुंबाच्या सुखसोयीसाठी खर्च करावे. भावंडाच्या भेटीगाठी होतील. प्रवास करावा लागेल. नोकरीमध्ये परिस्थिती चांगली राहील. प्रगतिकारक घटना घडेल. काहींना पदोन्नती मिळेल, तर काहींची बदली देखील होऊ शकते. कामाच्या स्वरूपात बदल घडून कामाचा व्याप वाढेल. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता कळतील. अचानक धनलाभ संभवतो.
प्रवासाचे योग येतील
कर्क – अनुकूल ग्रहमानाची साथ मिळाल्यामुळे घरामध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल. घरातील सदस्य एकमेकांविषयी आपुलकी वाढवतील. जमिनीची तसेच मालमत्तेची कामे होतील. मात्र थोडे सबुरीचे धोरण स्वीकारावे लागेल. घाईगर्दीत कोणताही निर्णय घेणे हितकारक ठरणार नाही. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवासाचे योग आहेत. सहकुटुंब सहपरिवार प्रवास घडू शकतो. नोकरीमध्ये बदल होऊ शकतात. मात्र ते बदल सकारात्मक होतील. व्यवसायामध्ये भरभराट होऊ शकते. नवीन करारमदार होण्याची शक्यता आहे.
आर्थिक प्रगती होईल
सिंह – या आठवड्यात आपली आर्थिक प्रगती होणार आहे. व्यवसायातील जुनी येणी वसूल झाल्याने व्यावसायिक प्रगती होईल. अनेक मार्गाने धन आगमन होऊ शकते. व्यवसायात नवीन बदल केल्यामुळे व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. जमीन-जुमला व्यवहारांमध्ये लाभ होईल. नातेवाईक, जुने मित्र यांच्या गाठीभेटी होऊ शकतात. सामाजिक, धार्मिक कार्यात भाग घ्याल. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळे अनेक कामे मार्गी लावू शकाल. मनोरंजनाकडे कल असेल. सप्ताह मजेत जाईल.
धार्मिक कार्य घडेल
कन्या – आतापर्यंत आलेला मनावरचा ताण कमी होण्यास सुरुवात होईल. जोडीदाराची साथ लाभेल. धनलाभाचे योग आहेत. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची मदत मिळेल. आपल्या जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र आपल्या बोलण्यावर व वर्तनावर नियंत्रण आवश्यक आहे. कोणाचाही अपमान करणे टाळा. कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे गतिमान होतील. मतभेद मिटतील. नोकरीत अनुकूल स्थिती निर्माण होईल, मात्र आपण राजकारण व गटबाजीपासून दूर राहा. मित्रमंडळींच्या वर्तुळात वादविवाद टाळा.
प्रेमिकांना अनुकूल कालावधी
तूळ – प्रलंबित कामे गतिमान होतील. सरकारी कामातील विलंब नाहीसा होईल. त्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटेल. एखादे महत्त्वाचे काम होऊ शकते. व्यावसायिकांनी सरकारी कायदे व नियम कसोशीने पाळायला हवेत. काहींना प्रवास करावे लागतील. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. अतिआत्मविश्वास नको. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल.जीवनसाथीबरोबरचे मतभेद संपुष्टात येतील. घरातील वातावरण आनंद देईल. प्रेमिकांना अनुकूल कालावधी. व्यवसायातील स्थिती समाधानकारक राहील.
समाधान लाभेल
वृश्चिक – अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करू शकाल. यशाचे प्रमाण वाढते राहील. नोकरीत आपल्याला नवीन अधिकार मिळेल. पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे योग आहेत. सामाजिक मानसन्मानात वाढ होऊन प्रतिष्ठेत भर पडेल. एखाद्या समारंभात मानाचे पद मिळेल. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहील. प्रेमामध्ये अनुकूल प्रतिसाद मिळू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक यात्रा घडून देवदर्शन होईल. त्यामुळे समाधान लाभेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या राहतील. त्यासाठी खर्चही करावा लागेल.
सकारात्मक राहाल
धनु – या सप्ताहात आपल्याला भाग्याची साथ मिळू शकते. प्रदीर्घ काळ मनात असलेली एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते. अडलेली कामे होतील. पर्यटन किंवा कामानिमित्त दूरचे तसेच जवळचे प्रवास घडू शकतात. प्रवासकार्य सिद्ध होतील. नोकरीत मानसन्मान मिळू शकतो. पदोन्नती, वेतनवृद्धी होईल. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. बदलीची तयारी ठेवा. आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. रागावर नियंत्रण आवश्यक. मुलांविषयी सकारात्मक राहा. व्यवसायात नवीन बदल फायद्याचे ठरतील. जुनी येणी वसूल होतील.
सहकार्य मिळेल
मकर – आपल्यासमोरील दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे होतील. विशेषतः सरकारी स्वरूपाची कामे. मात्र आजचे काम आजच करा. कामामध्ये विलंब नको. नोकरीत अपेक्षित सहकार्य मिळेल. वरिष्ठांबरोबरचे संबंध सुधारतील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जमीन-जुमला, संपत्ती विषयीचे व्यवहार गतिमान होतील. मध्यस्थी फलद्रूप होतील. वडिलोपार्जित संपत्तीविषयीचे मतभेद संपुष्टात येतील. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल. गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. अभ्यासामध्ये दुर्लक्ष करू नका. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल.
व्यावसायिक बदल होतील
कुंभ – कुटुंबातून तसेच आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला अपेक्षित सहकार्य लाभेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल. व्यावसायिक बदल फायदेशीर ठरतील. नवीन तंत्रज्ञान व नव्या संकल्पनांचा वापर करू शकाल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक. सहकुटुंब, मित्रमंडळींसमवेत प्रवासाचे योग आहेत. प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. राजकारणींना विरोध झेलावा लागेल. विरोधक आक्रमक बनू शकतात.
प्रलोभने टाळा
मीन – संमिश्र ग्रहमानामुळे आपल्याला संमिश्र फळे मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला कामांमध्ये अडथळे जाणू शकतात. त्याचप्रमाणे धावपळ आणि दगदग होईल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून सहकार्य करावे. मात्र स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण आवश्यक. व्यावसायिक परिस्थिती समाधानकारक राहून आर्थिक परिस्थिती सुधारेल. व्यावसायिक उलाढाल वाढून फायद्याच्या प्रमाणात वाढ होईल. जमीन-जुमला यांची कामे गतिमान होऊ शकतात. सरकारी नोकरीत प्रलोभने टाळणे हिताचे ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -