Thursday, September 18, 2025

IPL : आयपीएलच्या आगामी हंगामाकरिता नवा नियम

IPL : आयपीएलच्या आगामी हंगामाकरिता नवा नियम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामात नवा नियम लागू होणार आहे. ‘टेक्टिकल सबस्टिट्युशन’ या नव्या नियमानुसार संघाला नाणेफेकीदरम्यान प्लेइंग इलेव्हनसह त्यांच्या चार पर्यायी खेळाडूंची घोषणा करावी लागणार आहे. या चौघांपैकी अंतिम ११ मधील कोणत्याही खेळाडूला बदलण्यासाठी बोलावले जाऊ शकते. त्यामुळे आयपीएलमध्ये आता ११ नव्हे तर १५ खेळाडू खेळणार आहेत. त्या संदर्भातील माहिती इंडियन प्रीमियर लीगने ट्विट करून दिली आहे.

या बाबतीत आयपीएलतर्फे ट्विट करून सांगण्यात आले आले आहे की, पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १५व्या हंगामापासून रणनीतिक बदल (टेक्टिकल सबस्टिट्युशन) अंमलात आणले जातील. टाटा आयपीएलच्या या आवृत्तीमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ या नियमाचा मोठा प्रभाव पडेल,” असे ट्विट आयपीएलने केले आहे. “आयपीएल २०२३ च्या हंगामापासून आयपीएलमध्ये एक नवीन आयाम जोडण्यासाठी एक रणनीतिक संकल्पना सादर केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक संघ एक पर्यायी खेळाडू आयपीएल सामन्यात सक्रिय सहभाग घेण्यास सक्षम असेल,” असे लीगने जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

Comments
Add Comment